राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील काम रखडले आहे. अन्य काम पूर्ण झाले असले तरी शहरातील डेपोसमोरील उड्डाणपुलासह महामार्गावरील अन्य भागांमध्ये सुरू करण्यात आलेल्या लाईटचा गेल्या काही दिवसांपासून ‘स्विच ऑफ’ झाला आहे. त्यामुळे नागमोड्या वळणाच्या महागामार्गावरून वाहनचालकांना काळोखातून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील एसटी डेपो आणि तीन चार ठिकाणांचा तिढा सुटला नसल्याने येथील कामे रखडलेली आहेत. तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गावरून वाहनांचा सुरळीत प्रवास सुरू झाला आहे.
या वाहनचालकांना गेल्या काही दिवसांपासून नव्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. चौपदरीकरण झाले असले तरी महामार्ग नागमोडी वळण आणि अनेक ठिकाणी उताराचा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याचा संभव असतो. त्यामुळे महामार्गावर वीज व्यवस्था करण्यात आली आहे. या वीज व्यवस्थेमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर असलेल्या प्रकाशामुळे वाहनचालकांना वाहनांची वर्दळ लगेच लक्षात येते; मात्र शहरातील उड्डाणपूल परिसरातील वीज व्यवस्था गेल्या काही दिवसांपासून बंद स्थितीमध्ये आहे.
एसटी डेपोसमोरील उड्डाणपूल परिसरामध्ये वळण आणि उताराचा रस्ता आहे. या परिसरातील वीज व्यवस्था बंद असल्याने या भागामध्ये अपघात होण्याचा अनेक वेळा संभव असतो. त्यामुळे स्वीच ऑफ असलेली वीज व्यवस्था तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलासह महामार्गावरील बंद स्थितीमध्ये असलेले पथदीप सुरू करण्यासाठी सामाजिक कायर्कर्ते अरविंद लांजेकर यांनी सात-आठ महिन्यांपूर्वी प्रयत्न केले होते; मात्र त्यानंतर पुन्हा गेल्या दहा-बारा दिवसांपासून हे पथदीप बंद आहेत. अनंत आडविलकर, ग्रामस्थ
अधारात चोरट्यांचे फावते
शहरातील उड्डाणपुलाच्या येथील बंद स्थितीत असलेल्या विजेचा या परिसरातील नागरिकांना फटका बसतो. या परिसरामध्ये असलेल्या काळोखाचा फायदा घेत काही चोरट्यांनी या परिसरामध्ये हात साफ करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे. चोरट्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी उड्डाणपूल परिसरातील काहींनी आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेराही बसवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 20/Feb/2025
