राजापूर : पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा जलसंपदा विभागातर्फे उपसा केला जात आहे. हा गाळ तसाच नदीच्या काठावर पिचींग करून ठेवण्यात येत आहे. तो स्वः खर्चाने वाहून नेण्याचे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शेतकऱ्यांना केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. हा गाळ नदी काठावर पडून असल्याने पावसाळ्यात तो पाण्यासोबत पुन्हा नदीपात्रामध्ये वाहून येत नदीत साचण्याचा धोका निर्माण होणार आहे. पूरस्थितीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून जलसंपदा विभागातपर्फे गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 21/Feb/2025
