होळी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

रत्नागिरी : होळी उत्सवा कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) या दोन विशेष गाड्या धावणार आहेत.

विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :
१) गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष – (०११५१) मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन ही विशेष गाडी ६ मार्च आणि १३ मार्च रोजी मुंबई सीएसएमटीहून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मडगाव जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात (०११५२) मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी ही गाडी ६ मार्च आणि १३ मार्च रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी मडगाव जंक्शनवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

या गाडीला एकूण २४ कोच असून त्याची रचना पहिला एसी – ०१ कोच, कंपोझिट (प्रथम एसी + दोन टायर एसी) – ०१ कोच, दोन टायर एसी – ०२ कोच, तीन टायर एसी – १० कोच, स्लीपर – ०४ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०२ अशी असेल.

२) गाडी क्र. ०११२९/ ०११३० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष : (०११२९) लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन विशेष ही गाडी १३ मार्च आणि २० मार्च रोजी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी मडगाव जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात (०११३०) मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) ही विशेष गाडी १४ मार्च आणि २१ मार्च रोजी मडगाव जंक्शनहून दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ०५ मिनिटांनी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला एकूण २० एलएचबी कोच असून, त्याची रचना पहिला एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ अशी असेल.

गाडी क्रमांक ०११५२ आणि ०११३० चे बुकिंग २४ फेब्रुवारीपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. कोकणात होळी सणासाठी येणाऱ्या प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:53 PM 21/Feb/2025