Ratnagiri, Pavas : डोर्ले हर्चे रस्त्यावरील झाडी तोडण्याची मागणी

गावखडी/वार्ताहर : पावस विभागातील Ratnagiri, Pavas मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या हर्चे डोर्ले रस्त्याच्या दोन्हीं बाजूला वाढलेले गवत झाडी तत्काळ हटवण्याची मागणी डोर्लेतील सामजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे.

या रस्त्यावर दिवसा अपरात्री प्रवास करताना रस्त्यालगत वाढलेल्या झाडी झुडपांमुळे भीतीचे वातावरण असून प्रवास करताना जिक्रीचे झाले आहे. अश्यातच या मार्गावर दिवसेंदिवस बिबट्याची वाढलेली दशहत प्रवास करताना जाणवते. रस्त्यावर वाढलेली ही झाडी त्याने निर्माण झालेला अडथळा त्यातच रस्त्याच्या दोन्ही कडेला इकडून तिकडे प्रवास करणारे वन्य प्राणी ही आढळतात. अश्या प्रकारे डोर्ले हर्चे रस्त्यावरील वाढलेली झाडी गवत प्रवाश्यांना धोकादायक बनली असून याची दखल जी. प. बांधकाम विभागाने घेउन त्वरीत हटवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 03-10-2024