संगमेश्वर : पेंढाबेतील पाणी साठवण टाकीचे प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे पंचरत्नवाडी येथील पाण्याची समस्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरचे चेअरमन प्रशांत यादव यांनी येथे पाण्याची साठवण टाकी देण्याचे आश्वासन दिले होते. ही आश्वासनपूर्ती केल्यानंतर या ठिकाणी यादव यांच्या हस्ते साठवण टाकीचे उद्घाटन व जलपूजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी पंचरत्नवाडी विकास मंडळ पेढांबे (ता. संगमेश्वर) यांच्यावतीने प्रशांत यादव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आम्ही नेहमीच प्रशांत यादव यांच्या पाठीशी राहू असा शब्द ग्रामस्थांनी यावेळी दिला. यावेळी कॉंग्रेसचे सहदेव बेटकर, शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख अनिल मोरे, पेढांबे शाखाप्रमुख शांताराम मते, शाखाप्रमुख किशोर सुर्वे, वाडीप्रमुख यशवंत वेलोंडे, गावकर रामचंद्र वेलोंडे, मानकरी दीपक सुर्वे, चिपळूणचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, चिपळूणचे युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, विलास मते, अरुण सुर्वे, अनिल वेलोंडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 28/Feb/2025

Gadre1