राजापूर : माजी आमदार राजन साळवी शिंदे शिवसेनेत गेल्यानंतर पक्षाचा कोसळता डोलारा सावरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा सरसावला आहे. कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी राजापुरात नवीन कार्यालयाचा प्रारंभ आणि कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा शनिवारी (ता. १ मार्च) सायंकाळी चार वाजता होणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून, जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडून गेले.
यातून सावरण्यासाठी शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील तालीमखाना येथे स्टेटबँकेजवळ नवीन कार्यालय सुरू होत असून, त्याचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. या वेळी शिवसेनेच्या नेत्यांकडून शिवसैनिक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. मेळाव्याला शिवसेना सचिव विनायक राऊत, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार गणपतराव कदम, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, युवानेते अजित यशवंतराव आदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 01/Mar/2025














