कोरे मार्गावर शिमगोत्सवासह उन्हाळी सुट्टीसाठी ‘उधना मंगळूर’ धावणार

खेड : शिमगोत्सवासह उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित गाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशलच्या ७० फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ही साप्ताहिक स्पेशल २ मार्चपासून २९ जूनपर्यंत वसईमार्गे धावेल.

१३ मार्चपासून शिमगोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. शिमगोत्सव संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीचा हंगामही सुरू होणार आहे. शिमगोत्सवासह उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. गावाहून मुंबईला कुटुंबियांसमवेत जाणाऱ्या बच्चेकंपनीची संख्याही तितकीच असते. याचमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना मंगळूर स्पेशलच्या ७० फेन्या जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. ०९०५७/०९०५८ क्रमांकाची उधना मंगळूर. द्विसाप्ताहिक स्पेशल २ मार्च ते २९ जून या कालावधीत दर बुधवार व रविवारी धावेल. उधना येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ३ मार्च ते ३० जून या कालावधीत दर गुरूवार व सोमवारी धावेल.

मंगळूर येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी उधना येथे पोहचेल. या स्पेशलमुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 01/Mar/2025