रत्नागिरी : श्री देव भैरीच्या शिमगोत्सवाची रूपरेषा ठरवण्यासाठी उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा

रत्नागिरी : सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या श्री देव भैरी देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 2 मार्च 2025 रोजी सकाळी १० वाजता घेण्याचे श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टतर्फे ठरवण्यात आले आहे.

तरी बारा वाड्यातील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी आणि ग्रामस्थ बंधूंनी श्रीदेव भैरी मंदिरात उपस्थित राहावे असं आवाहन श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्ट, झाडगाव रत्नागिरीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 01/Mar/2025

Amey jwelrs