रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील उगवती पाचकुडेवाडी येथे संशयिताने पिण्याच्या पाण्यात कोणता तरी पदार्थ मिसळून पाणी दूषित केले आहे. ही घटना शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी महेश रमेश पाचकुडे (रा. मु. पो. उगवती पाचकुडेवाडी करबुडे, रत्नागिरी) असे या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पाचकुडे याच्या विरोधात सदाशिव गोविंद पाचकुडे (रा. गवती पाचकुडेवाडी करबुडे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महेश पाचकुडे हा वाडीतील लोकांना काहीना काहीतरी करून नेहमी त्रास देत असतो. शनिवारी यातील संशयिताला तेथील लोकांनी वाडीतील पाण्यात काहीतरी मिळताना पाहिले. त्यावरुन त्याने वाडीतील लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिळसून ते दषित केले. संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 AM 03/Mar/2025














