रत्नागिरी : दस्त नोंदणीसाठी कार्यालयीन वेळेत वाढ

रत्नागिरी : दस्त नोंदणी कार्यालयांवरील भार लक्षात घेता १ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. आता ही कार्यालये रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

नोंदणी उपहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांत शुल्क विभागाला ५० हजार कोटी रुपयांच्या महसूलाचे उद्दिष्ट होते. यंदा हे उद्दिष्ट ५५ हजार कोटी रुपये आहे. फेब्रुवारीत राज्यात ४८ हजार ९९५ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. एकूण उद्दिष्टांच्या तुलनेत हे उत्पन्न ८९ टक्के आहे. त्यातून राज्यात सुमारे २५ लाख एवढी दस्त नोंदणी करण्यात आली.

पुढील महिनाभरात आणखी ७ हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे विभागापुढे उद्दिष्ट आहे. मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी व्हावी, यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान तीनशेहून अधिक दुय्यम निबंधक कार्यालयांच्या वेळांमध्ये २ तासांनी वाढ करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 03/Mar/2025

Happy journey english