चिपळूण : पोफळी-कुंभार्ली घाट परिसरात कोळसुंदांचा उच्छाद

चिपळूण : पोफळी-कुंभार्ली घाट परिसरात सध्या कोळसुंदांनी उच्छाद मांडला आहे. परिसरात तीन सांबरांवर हल्ला केला असून, त्यामध्ये दोन सांबरांचा जीव गेला आहे, तर एक सांबर जखमी झाले आहे. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

पोफळी-कुंभार्ली घाटपरिसरात यापूर्वी कोळसुंद्यांनी एका गायीची शेपटी चावली होती. ही घटना ताजी असतानाच आता सांबरावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळसुंदे अधिक आक्रमकपणे आता इतर प्राण्यांवर हल्ले करत आहेत.

काही दिवसांपूर्वी दोन सांबरांचे लचके तोडून त्यांना ठार केले. त्यांची दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, दोन दिवसांत आणखी एका सांबरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. त्यांचे डोळे फोडून लचका तोडला आहे. त्याने शर्थीचे प्रयत्न करून आपला जीव वाचवला आहे. अशा घटना वारंवार घडत आहे. पोफळी-कुंभार्लीचा परिसर हा भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जवळच असताना वनखाते दखल घेत नाही, असे माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव खरात यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 03/Mar/2025