रत्नागिरी : जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील स्वच्छता ठप्प?

रत्नागिरी : जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील स्वच्छता ठप्प झाली आहे. कोल्हापूर आरोग्यसेवा उपसंचालक मंडळाकडून रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्याविषयी आदेश प्राप्त झाल्याने हा परिणाम दिसून येत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सुधारित आदेश प्राप्त होईपर्यंत मे. बी. एसए. कॉर्पोरेशन लि. या कंपनीने काम सुरू करू नये, असे आदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकीर्दीतील आणखी एका निर्णयाला स्थगिती दिली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या साफसफाईसाठी दिलेल्या ३ हजार हजार १९० कोटींच्या कटात्राला स्थगिती देण्यात आली यामध्ये कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या स्वच्छतेसाठी बाहायंत्रणेद्वारे यंत्रासामुग्री मागविण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. यासाठी पुण्यातील एका कंपनीला वार्षिक ६३८ कोटी रुपये देण्यात आले.

विशेष म्हणजे अर्थ विभागाची मान्यता नसताना ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सहा वर्षांसाठी ३१९० कोटींचे हे कंत्राट देण्यात आले होते. हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या माध्यमातून कंत्राटदाराला कोट्यावधी रुपयांचा फायदा मिळवून देण्यात येणार होता असा आरोप झाल्याने आता आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात येणार असून कथित गैरव्यवहाराची चौकशी केली जाणार आहे. माजी मंत्री सावंत यांनी २०२४ ला पुण्यातील एका खासगी कंपनीला ३ हजार १९० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली होती. या निविदा प्रक्रियेमधील पारदर्शकता तपासली जात आहे.

स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत आदेश नाही
सहसंचालक, आरोग्य सेवा रुग्णालय कक्षाकडून ही सेवा सुरु करण्याबाबतचे आदेश व मार्गदर्शन स्कोप ऑफ वर्क आणि एमओयु बाबतचे आदेश आयुक्तालयाकडून देण्यात आलेले नाहीत, असे उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे डॉ. दिलीप माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्य सहसंचालकांच्या आदेशानुसार आपण जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील स्वच्छतेचे काम थांबवले आहे. पुढील आदेश आल्यानंतर त्यावर निर्णय होईल- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 04/Mar/2025