कोकणची भूमी ही सर्वार्थाने श्रेष्ठच : पोलिस महानिरीक्षक संजय दराडे

चिपळूण : कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी लो. टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. यावेळी प्रकाश देशपांडे यांनी कोकणच्या बुद्धिवैभवाचे दर्शन घडविणाऱ्या महनियांचा सविस्तर परिचय सांगून एवढी मोठी बुद्धी संपदा असलेली अपरांत भूमी सर्वाथनि श्रेष्ठ असल्याचे सांगितले.

सुमारे एक तास त्यांनी प्रत्येक तैलचित्र बारकाईने निरीक्षण करून माहिती घेतली. लोटिस्माच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संजय दराडे म्हणाले की, हे कलादालन सर्वांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहायला हवे. यापूर्वी यातील अनेक व्यक्तींची माहिती होती; मात्र ते कोकणातले होते, हे आज समजले. या कार्यासाठी कसली मदत लागली, तर नक्की सहकार्य करू. यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी नगरसेवक सुनील कुलकर्णी लोटिस्माचे कार्यवाह विनायक ओक आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 10/Mar/2025

Shanti 3