◼️ उबाठाच्या मानसी पेडणेकर यांचा केला दारुण पराभव
रत्नागिरी : खेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वसंत उर्फ आबा सोमा बंडबे यांनी 9 विरुध्द 4 मतांनी प्रभारी सरपंच मानसी मंगेश पेडणेकर यांचा दारुण पराभव केला. पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न चे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख बाबू म्हाप व त्यांच्या सहकार्यांनी खेडशी ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील या मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने कायम ठेवत उबाठाला धोबीपछाड दिला.
खेडशी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांनी अडीच वर्षानंतर आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदाचा कारभार प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच मानसी मंगेश पेडणेकर या पहात होत्या. शुक्रवारी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार रिध्दी गौरे यांनी काम पाहिले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून ज्येष्ठ सदस्य वसंत उर्फ आबा सोमा बंडबे हे सरपंचपदासाठी रिंगणात उतरले होते तर उबाठाकडून मानसी मंगेश पेडणेकर या रिंगणात होत्या. दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान पार पडले. यात नऊ सदस्यांनी आबा बंडबे यांना मतदान केले तर मानसी पेडणेकर यांच्या पारड्यात चार सदस्यांनी मते टाकली. 9 विरुध्द 4 अशा पाच मतांनी आबा बंडबे विजयी झाल्याने शिवसेनेकडून एकच जल्लोष करण्यात आला. मतमोजणीनंतर मानसी पेडणेकर व त्यांचे सहकारी ग्रामपंचायतीमधून निघून गेले.
खेडशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावाने जयघोषण करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, तालुका संघटक भिकाजी गावडे, विभागप्रमुख प्रकाश रसाळ, प्रवीण पवार, युवासेना विभागप्रमुख हर्षराज पाटील, उपविभागप्रमुख पिंट्या साळवी, रमेश कसबेकर, प्रथमेश पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले. यावेळी मोठ्या संख्येने खेडशी ग्रामस्थांनी उपस्थित राहून विजयाचा जल्लोष केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 05-10-2024