राजापूर : गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा शिक्षण विभागाची डोकेदुखी ठरलेली आहे. शासनातर्फे होत असलेली शिक्षकभरती, जिल्हा बदली यामुळे तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जातील, अशी साऱ्यांची अपेक्षा होती. ती फोल ठरली आहे. मंजूर असलेल्या ९२१ शिक्षक पदांपैकी ७२१ पदे भरलेली असून, तब्बल २०० शिक्षक पदे रिक्त आहेत. अशा स्थितीमध्ये नवीन संचमान्यता लागू झाल्यास कार्यरत असलेल्या २१४ पदवीधर शिक्षकांपैकी तब्बल १८४ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
आधीच रिक्त पदांमुळे शिक्षण विभागाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, पालकांचा राग शांत करून शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामध्ये आता नवीन संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकसंख्या होणार असल्याने शिक्षण विभागाला नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
आधीच विविध कारणांमुळे शाळांमधील पटसंख्या घटत असताना आता जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक जागांवरून शिक्षण विभागाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सातत्याने विविध कामानिमित्ताने शाळांमधील कार्यरत शिक्षकांना जावे लागत असल्याने त्यातूनही पालकाचा रोष अधिकच वाढतो. त्यामध्ये आता नवीन संचमान्यता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी तब्बल १८४ पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 12/Mar/2025














