रत्नागिरी : मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज आपल्या सामाजिक बांधिलकीतून वृद्धाश्रमांसाठी किराणा माल, आरोग्य तपासणी, त्यांना लागणारी फिजिओथेरपी, त्यासाठीचे उपकरण पुरवून सकारात्मक कार्य सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त रत्नागिरीतील पावस येथील आनंदी अनुसया वृद्धाश्रमात १५ ज्येष्ठ नागरिकांसोबत व सहकाऱ्यांबरोबर आनंददायी संध्याकाळ घालवण्यात आली.
संध्याकाळची सुरुवात एका मनोरंजक भजनाने करण्यात आली, ज्याने सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिला. हा सोहळा साजरा करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने ज्येष्ठ नागरिक आनंदित झाले. सर्वांनी भजनाच्या कार्यक्रमाचा आणि नाश्त्याचा मनापासून आस्वाद घेतल्याने वातावरण जल्लोषाने भरले होते. मुकुल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज आपल्या सामाजिक बांधिलकीतून गेले काही वर्षे रत्नागिरीमधील स्वगृही वृद्धाश्रम, अरुणाश्रम लांजा, आनंदघर यांसारख्या वृद्धाश्रमांना मासिक किराणा सामान, सोलर लाईट सिस्टीम, फिजिओथेरपी सेशन, ऑर्थोटिक उपकरणांसह सक्रियपणे मदत करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 05/Oct/2024
