दापोली : निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने निवेदिता प्रतिष्ठान, रत्नग्रीन अॅग्रो, जनशिक्षण संस्था रत्नागिरी आणि दापोली एसटी आगारातर्फे दापोली एसटी स्थानक आणि एसटी आगार येथील कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात आला. निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगाराचा स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बसस्थानक हा प्रकल्प १५ ऑगस्ट २०२३ पासून सातत्याने सुरू आहे. गेल्या सव्वा वर्षांमध्ये पंधरा हजार पाण्याच्या बाटल्या आणि पाचशे किलो प्लास्टिक खाऊचे रॅपर्स याचा कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात आला. यासाठी तालुक्यातील विविध महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था, विविध महिला बचतगट, विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दापोली आगारप्रमुख रेश्मा मधाळे, जनशिक्षणच्या नीशा उपलप, प्रणव रेळेकर, निवेदिता प्रतिष्ठानच्या महेश्वरी विचारे, वैभवी सागवेकर आदीचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 05/Oct/2024