रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसीत ८० हजारांची केबल चोरीला

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीमधील तब्बल ८० हजार रुपये किंमतीची केबल अज्ञाताने लांबवली. याबाबत राजू महिपती सोनावणे (४२) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 15/Mar/2025