राजापूर : रोजगार वा व्यवसायानिमित्ताने विविध ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या बंजारा समाजाच्या वतीने बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघ राजापूरच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जुवाठी येथे होळी उत्सव उत्साहामध्ये साजरा केला. होळी उत्सवात धुंड नामक कार्यक्रमात गोविंद चव्हाण या बंजारा बांधवाच्या नूतन बाळाचे निखिल नामकरण करण्यात आले.
बंजारा समाजासाठी होळी उत्सव खूप महत्त्वाचा असतो. पहाटे पाच वाजता होम पेटवण्यात येतो. पहाटेचा होम पेटवण्यासाठी पुरुष मंडळी जातात. त्यानंतर सायंकाळी महिला व नूतन बाळ होळीच्या पाया पडायला जाऊन होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. दिवसभर सांहकृतिका कार्यक्रम सादर केले जातात. दुसन्या दिवशी गेरनंतर होळीची समाप्ती होते. यंदाही बंजारा समाजसेवा संघाचे अध्यक्ष डी. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जुवाठीत होलिकोत्सव साजरा झाला. या वेळी नामदेव राठोड, राजू राठोड, वामन राठोड, सचिन राठोड, किरण पवार, प्रदीप नाईक, परसू राठोड, मोरया चव्हाण, दिलीप राठोड, अर्जुन राठोड, कासू राठोड, गोविंद राठोड, विलास राठोड, ज्योती चव्हाण, शारदा राठोड आदीसह बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांजणा, गेर म्हणजे काय ?
नूतन बालकाच्या बारशाची तयारी करताना विविध गाण्यांच्या माध्यमातून देवाचे नामस्मरण केले जाते. त्याला वांजणा, असे म्हटले जाते. आदल्या दिवशी वाढदिवस साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरोघरी जेवणाचा कार्यक्रम असतो, त्याला गेर कार्यक्रम म्हटले जात असल्याची माहिती बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघ राजापूरचे अध्यक्ष डी. एम. चव्हाण यांनी दिली.
बंजारा समाजाच्या परंपरा
बंजारा समाजासाठी होळी उत्सव खूप महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये सेवे धुंड आणि गेरसारख्या पारंपरिक परंपरा पाळतात. होळीच्या आठ दिवसांपूर्वी वांजणा घालण्यात येतो. वांजणा घातल्यानंतर होळोला प्रारंभ होतो. पौर्णिमेच्या दिवशी होळीपूर्वी जन्मलेल्या नूतन बाळाचे बारसे घालण्यासाठी पाल मांडण्यात येते. बंजारा समाजात होळीपूर्व काळात मुलगा जन्माला आला की त्याचे बारसे होळीला करतात. त्याला धुंड म्हटले जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 19/Mar/2025














