मंडणगड : दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मंडणगड : धुत्रोली येथे ७ मार्चला झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या अनुराधा आशिष मोरे (३४, रा. म्हाप्रळ-चिंचाळी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत महिलेचे पती आशिष मोरे यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १७) माहिती दिली. अनुराधा मोरे व मुलगा हे दोघे ७ मार्च रोजी मंडणगड येथे बाजारात आले होते. घरी परत जात असताना धुत्रोली येथे दुचाकी घसरून अपघात झाला. यात अनुराधा मोरे यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर माणगाव येथे दाखल केले. माणगाव येथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी एम. जी. एम. रुग्णालय, कामोठे येथे पाठवले. तेथील डॉक्टरांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत मंडणगड पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 19/Mar/2025