पावस : शेतकऱ्यांच्या विविध योजना राबवताना लॉटरी पद्धत बंद करून प्रथम अर्ज करणाऱ्या लाभार्थीला अग्रक्रम द्या. तरच रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, अशा आशयाचे निवेदन उद्यात पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी अजय रवींद्रनाथ तेंडुलकर यांनी रत्नागिरीतील दौऱ्यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदनाचा विचार करून लॉटरी पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सांगण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना राबवताना अग्रक्रमाने येणाऱ्या लाभार्थीना त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
डोरले येथील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त अजय रवींद्रनाथ तेंडुलकर ह्यांना १० फेब्रुवारी २०२५ रोजी कृषिमंत्री यांच्यासोबत कोकण विभागीय चर्चासत्रासाठी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे रत्नागिरी जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी जिल्ह्यातून कृषी विभाग मार्फत पाठवण्यात आले होते त्यावेळी त्यांनी कृषिमंत्री यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत चर्चा केली व निवेदनही दिले होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थीची संख्या कमी असल्यामुळे शासकीय योजनेचा वेळेवर लाभ घेता येत नाही त्यापासून ते वंचित राहतात याची गांभीयनि नोंद घेऊन त्याची दखल घेऊन दिनांक १७ मार्च २०२५ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध योजनांसाठी लॉटरी पद्धत बंद करावी व प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने योजना राबवाव्यात हा विषय मान्य करून लॉटरी पद्धत बंद करण्यात आली अशा तऱ्हेने कृषिमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 21/Mar/2025














