शृंगारतळी : उत्कर्ष युवक मंडळ कोंड कारुळ, श्री आविष्कार मंडळ दिवाणतड वाडी व जि.प.शाळा कोंड कारुळ बो-या ता.गुहागर जि.रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्ष लागवड व पर्यावरण जनजागृती करण्यात आली.
वनपरिमंडळ अधिकारी श्री.मुरलीधर गोविंद जागकर यांचे प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसह कोंड कारुळ गावामध्ये रॅली काढून जन माणसांत वन विषयक जनजागृती व्हावी याकरिता काही वन बाबत घोष वाक्ये देणेत आली. सन २०२४-२५ या वर्षी शालेय हिवाळी क्रिडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावरील विविध खेळात नैपुण्य दाखविणा-या विद्यार्थ्यांचे हस्ते कोंड कारुळ येथील बंदर रस्त्यावर पर्यावरण पुरक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्ष लागवड व पर्यावरण जनजागृती उपक्रम रॅली मध्ये कोंड कारुळ गावचे विद्यमान सरपंच सौ.निलीमा प्रताप अडूरकर ,श्री आविष्कार मंडळ दिवाणतड वाडीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री.सुदर्शन अडूरकर व सेक्रेटरी श्री.संतोष जागकर व कोंड कारुळ बो-या जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.माने सर व इतर शिक्षक वृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 22-03-2025














