शिवसेना अनुसूचित जाती व जमाती सेल खेड तालुका अध्यक्षपदी संतोष खोपकर यांची निवड

खेड : संतोष खोपकर यांची शिवसेना अनुसूचित जाती व जमाती सेल खेड तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी पर्यावरण मंत्री व माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते संतोष खोपकर यांना निवड पत्र देण्यात आले.

या निवडीनंतर खोपकर म्हणाले, शिवसेनेच्या विचारधारेनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि विकास पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, युवा सेना तालुका अधिकारी मिलिंद काते, कौशल चिखले आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 24/Mar/2025