खेड पंचायत समितीचा कारभार प्रभारींकडे

खेड : पंचायत समितीचा कारभार अजूनही प्रभारीच्या हातात आहे. गटविकास अधिकारी यशवंत भांड यांची बदली झाल्यानंतर अजूनही येथील पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळालेले नाहीत. दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्याकडे येथील कार्यभार सोपवण्यात आला आहे.

येथील पंचायत समितीत प्रभारींचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. कायमस्वरूपी गटविकास अधिकारी म्हणून यशवंत भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकीय कारभारासह विकासकामांनाही गती मिळाली होती; मात्र भांड यांची बदली झाली. त्यामुळे येथील कार्यभार मंडलिक यांच्याकडे आहे. ते पंचायत समितीत मोजकेच दिवस उपस्थित राहतात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातही प्रभारी अधिकारी आहेत. ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कार्यालयीन कामकाजाचा बोजवारा उडाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 24/Mar/2025