रत्नागिरीत सोळा वर्षीय युवतीची आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील हिंदू कॉलनी परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्या एका १६ वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ही युवती पाली परिसरातील एका गावात राहणारी आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याया सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत मृत झालेली ती अल्पवयीन युवती हिंदू कॉलनी येथे शिक्षणानिमित्ताने राहायला होती. रत्नागिरीत ती ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. शनिवारी राहत्या घरी कुणीही नसताना तिने घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला होता. दुपारी विजय वासुदेव यादव हे आपल्या घरी आले असता, त्यांना ती युवती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

या घटनेची खबर यादव यांनी शहर पोलिसांना दिली. त्या युवतीला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान सूत्रांनी तिला दुपारी २.३० वा. मृत घोषित केले.

पोलिसांनी पंचनामा केला असता त्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील या करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 24/Mar/2025