साडवली येथे आज संभाजी भिडे यांचे व्याख्यान

देवरुख : संभाजी भिडे गुरुजी यांचे २४ रोजी सांडवली येथील पीएस बने इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर धर्मवीर बलिदान मास निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५.३० वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सहवासाने पावन झालेल्या संगमेश्वर धर्मभूमी मध्ये संभाजी महाराजांचा इतिहास व त्यांचे बलिदान यामुळे जिवंत असलेल्या हिंदुस्थानचे वास्तव्य अनुभवण्यासाठी व धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

भिडे गुरुजी यांच्या अमोघ वाणीतून या सर्व प्रश्नांची उत्तरे व संभाजी राजांचे बलिदान यावर विस्तृत माहितीपर मार्गदर्शन भिडे गुरुजी करणार आहेत. या व्याख्यानाचा लाभसर्व शिवप्रेमी नागरिकांनी घेण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 24/Mar/2025