रत्नागिरी : शासकीय कार्यालयातील ई-मेल तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश

रत्नागिरी : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात ई-मेल द्वारे करण्यात आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने व प्रशासकीय विभाग कोंकण व जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयातील लोकसेवक अर्जदारास ई-मेल प्राप्त झाल्याची पोहोच देत नसल्याने माहिती अधिकार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर यांनी तक्रारवजा निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना दिले होते. त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी सर्व जिल्ह्यातील आस्थापना यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

तालुक्याचे तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक, भूमी अभिलेख तसेच इतर सर्व आस्थापना यांना कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 24/Mar/2025