दापोली : येथील संस्कार भारतीतर्फे गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिमध्ये चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन लेखक-चित्रकार जितेंद्र पराडकर, निसर्ग चित्रकार विष्णू परीट व चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर, दापोली शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, मुख्याध्यापक शेठ यांच्या उपस्थितीत झाले. जितेंद्र पराडकर आणि चित्रकार राजश्री पाटणकर यांनी या कलाप्रदर्शनाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या सभागृहामध्ये निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांचे निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक झाले. याचवेळी एका बाजूला चारकोल कलाकार सतीश सोनवडेकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने चारकोलमध्ये लाईव्ह पोर्ट्रेट करून दाखवले. त्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. या प्रदर्शनामध्ये दापोली परिसरातील २८ हौशी चित्रकारांची सुमारे १५० च्यावर चित्रे प्रदर्शित झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 24/Mar/2025














