नंबरप्लेट बदलासाठी संगमेश्वर तालुक्यात सेंटर सुरू करण्याची मागणी

संगमेश्वर : जुन्या वाहनांची नंबरप्लेट बदलण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सेंटर सुरू करण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली आहे. संगमेश्वर तालुक्यातही एक सेंटर सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबरप्लेट बसवण्यास सक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दोनच सेंटर असल्याने अनेक वाहनचालकांची फरफट होत आहे. संगमेश्वरमधील वाहनचालकांना रत्नागिरीत जावे लागते. त्याठिकाणी गर्दी असल्याने वाहनचालकांना रांगेत थांबावे लागते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 24/Mar/2025