मालगुंड येथे हॉटेल कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : मालगुंड येथील एका हॉटेल कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार २३ मार्च रोजी रात्री ११.३० वा. सुमारास घडली. वसंत रघूनाथ जाधव (६४, मूळ रा. सुतारवाडी रोड, हवेली पुणे, सध्या रा. मालगुंड, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

रविवारी रात्री वसंत जाधव हे रात्री हॉटेलमधील कामकाज आटोपून जेवण करुन हॉटेलमध्ये बसलेले असताना त्यांना अचानकपणे दम लागला. सहकाऱ्यांनी त्यांना प्रथमोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वसंत जाधव यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 25/Mar/2025