दापोलीच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचं साम्राज्य

दापोली : पर्यटन तालुक्यात दापोली मंडणगड या मुख्य मार्गावर शहराच्या प्रवेशद्वारावर पडलेले खड्डे वाहन चालकांच्या स्वागताला आहे का? असा संतापजनक सवाल आता दापोलीतील नागरिक उपस्थित करत आहेत. या भल्या मोठ्या खड्यांमुळे वाहन चालक बेजार झाले असून या मार्गाचे काम कधी होणार, असा सवाल रोज उपस्थित होत आहे.

रहदारीचा मुख्यमार्ग असल्याने या मार्गावर स्थानिक नागरिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने ये जा करत असतात. अशा वेळी या महाकाय खड्याने महागड्या गाड्यांचे नुकसान होत असून अपघातही वाढले आहेत. दापोली तालुक्याचे विकासासाठी कोट्यवधीचा निधी आला आहे असे सांगितले जात असताना या रस्त्याला निधी नाही का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

दापोली बसस्थानक ते खोंडा हा जवळपास एक कि.मी. चा रस्ता दयनीय अवस्थेत आहे. या मार्गाची दुरुस्ती व्हावी किंवा रस्ता नव्याने व्हावा म्हणून नागरिक मागणी करत आहेत. मात्र, अनेकवेळा या मार्गावर निधी खर्च करण्यास हात आखडता घेतला जात असल्याचे दिसत आहे.

अनेक महिन्यांपासून मासळी मार्केट नजीक मंडणगड या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्री वाहनांच्या उजेडाने दुचाकी यांचे या खड्यात आदळून अपघात होत आहेत. तरी ही साधे खड्डे बुजव्याची तसदीदेखील घेतली जात नाही – संदीप भाटकर, नागरिक, दापोली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 25/Mar/2025