राजापूर : रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उद्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन

राजापूर : आरोग्य विभागाकडून राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिविर २६ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित केले आहे.

शिबिरात अंससर्गजन्य विभाग ग्रामीणरुग्णालय रायपाटणकडून मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक आरोग्य, अंसंसर्गजन्य आजार, क्षयरोग, सर्व प्रकारचे कॅन्सर यावर उपचार करण्यात येणार असून रक्तातील साखर, रक्तदाब, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, बेडका तपासणी छातीचा एक्सरे इत्यादी रुग्णांच्या तपासण्या करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध मनोसोपचार तज्ज्ञ डॉ. अतुल ढगे, फिजिशियन डॉ. कृपाली कुमावत, स्त्रीरोग विशेष तज्ज्ञ वर्ग १ व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय राजापूर चे डॉ. राम मेस्त्री हे उपस्थिती राहून तपासण्या व उपचार करणार आहेत. तालुक्यातील पूर्व भागात होणाऱ्या या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 25/Mar/2025