रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व संस्था आणि त्यांचे विश्वस्त यांच्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ ते २ या वेळेत येथील दैवज्ञ भवन, नाचणे रोड येथे विश्वस्तांची कार्यशाळा होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व संस्था आणि त्यांचे विश्वस्त यांच्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ला सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या वेळेत चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे विश्वस्तांची कार्यशाळा होणार आहे.
रत्नागिरी येथे होणाऱ्या य कार्यशाळेसाठी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून अॅड. शहाणे, सनदी लेखापाल आनंद पंडित, करसल्लागार धनेश रायकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत संस्था नोंदणी, न्यास किंवा संस्था बदल अर्ज कलम २२, न्यासाचे हिशोबपत्र आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 25/Mar/2025














