लांजा शहरात नागरिकांची पाण्यासाठी ओरड

लांजा : लांजा नगरपंचायत पाणीपट्टी वसुलीसाठी अॅक्शन सोडवर असून, एकीकडे पाणीपट्टी वसुली जोरदार सुरू आहे; मात्र दुसरीकडे नागरिकांची पाण्यासाठी ओरड सुरू आहे. वारंवार – नगरपंचायतीला कळवूनही याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावला आहे. घरोघरी जाऊन नगरपंचायतीचे कर्मचारी वसुली करत आहेत; मात्र नागरिकांची पाण्यावाचून होणाऱ्या गैरसोयीकडे नगरपंचायत सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.

नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.९ मध्ये साधारणतः एक महिन्यापासून पाण्याच्या संदर्भात तक्रारी आहेत. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कळवले; परंतु थातुरमातूर उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. पाणीपट्टी भरूनही नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायतीवर धडक देण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 25/Mar/2025