संगमेश्वर बसस्थानकाचे काम रखडले

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या संगमेश्वर बसस्थानकाचे काम जोरदार सुरू आहे. मात्र, स्वच्छतागृह आणि येथील एका दुकानामुळे हे काम रखडले आहे.

तीन कोटी रुपये खर्च करून हे स्थानक उभारण्यात येत आहे. सद्य स्थितीत रंगरंगोटी आणि इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. या ठिकाणच्या स्वच्छतागृहावर प्रवासी अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या एका बंद गाळ्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. नवीन स्वच्छतागृहाचे काम सुरू करण्यासाठी पर्यायी स्वच्छतागृह सुरू करणे आवश्यक आहे.

याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही एसटी महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तसेच येथील अडथळा ठरणारा बंद गाळा हटविण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच नवीन बसस्थानकाचे उर्वरित काम रखडले असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 25/Mar/2025