पावस : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गावडे आंबेरे सातपऱ्या पुलाच्या भरावाचे उर्वरित काम अखेर संतगतीने सुरू झाले आहे. मात्र, त्यामुळे यंदा हा पूल वाहतुकीस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावडे आंबेरे सातपऱ्या येथे छोटा कॉजवे असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे वारंवार वाहतूक खंडीत होत होती. दरवर्षीच हा प्रश्न निर्माण होत होता. यासाठी येथे मोठ्या पुलाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बुडीत क्षेत्र कार्यक्रमांतर्गत ३ वर्षांपूर्वी या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु या कामात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने संथगतीने काम सुरू होते.
दोन वर्षांत या कामाला बराच विलंब झाला होता. एकीकडे गावडे आंबेरे भागातील भरावाचे व पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु नातुंडे भागातील काम अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे मागील वर्षी पावसाळ्यामध्ये फारच अडचणी निर्माण झाल्या होत्या. रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडू लागल्यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत होती.
त्यातच भरावाचे काम पूर्ण न करता ठेकेदार प्रसार झाल्यामुळे एका बाजूच्या भराव गेल्या वर्षभर अर्धवट स्थितीत राहिला होता, तो पूर्ण करण्याची मागणी स्थानिक पातळीवरती केली जात होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
अखेर ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सध्या अर्धवट स्थितीमध्ये असलेल्या नातुंडे ते परिसरातील भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे सध्या भरावाचे काम करून रस्ता पुलाला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरामध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 25/Mar/2025














