चिपळूण : ग्रामदैवत कालभैरव सांस्कृतिक मंचतर्फे ३० मार्चला सायंकाळी चार वाजल्यापासून हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणार आहे. स्वागतासाठी शोभायात्रा हिंदू धर्म संस्कृती परंपरेचे जतन, संवर्धन, हिंदू संघटन यासाठी तसेच चिपळूणमधील सांस्कृतिक, सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी गेली २४ वर्षे गुढीपाडवा शोभायात्रा काढली जात आहे.
यावर्षीही त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेमध्ये शहरातील विविध संस्था, मंडळांतर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. हिंदूंच्या सर्व संस्था, मंडळे, देवस्थाने यांनी एकत्रितरीत्या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामदैवत कालभैरव सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विश्वास रघुनाथ चितळे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 25/Mar/2025













