गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे नव्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर वॉटर स्पोर्ट व्यवसायामधील दोन जेसकी बोट दाखल झाल्या आहेत. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या दुर्घटनेला आळा बसेल, असे मत व्यक्त होत आहे. या समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट व्यवसाय सुरू झाल्यापासून गणपतीपुळे ग्रामपंचायतीबरोबरच वॉटर स्पोर्टने भरीव अशी कामगिरी करून बुडणाऱ्यांना वाचविण्याचे सेवाभावी कार्य केले आहे. या वॉटर स्पोर्टमुळे एखादा पर्यटक खोल समुद्रात गेला तर त्याला क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ बाहेर आणण्याचे काम केले जाते. त्यामुळे या ठिकाणी वॉटर स्पोर्टमुळे आता बुडणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि या ठिकाणी दुर्घटनेमुळे लागणारे गालबोट देखील कमी होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 07/Oct/2024
