देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाज भवनाच्या विस्तारीकरणासाठी ५० लाखांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच कामांना गती मिळणार आहे.
सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी हे भवन विस्तारीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. भव्य, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा असलेल्या या समाजभवनात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम सामाजिक मेळावे आयोजित करता येणार आहेत. कुणबी समाज भवनाच्या विस्तारासाठी निधी मंजूर झाल्याने समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी आमदार निकम यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सामाजिक सलोखा आणि विकासाची गती हीच आमची खरी बांधिलकी आहे. समाजाच्या हितासाठी काम करणे, हे माझे कर्तव्य असून, कुणबी समाज भवनाचे हे विस्तारीकरण त्याचेच एक प्रतीक आहे, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजना कार्यान्वित करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या भव्य समाज भवनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता अंतिम टप्प्यातील प्रक्रिया गतिमान होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 26/Mar/2025














