रत्नागिरी : जिल्ह्यात घरकुलांचे १९ हजार ३२५ प्रस्ताव मंजूर

रत्नागिरी : प्रत्येकाचे हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकजणांना आर्थिक परिस्थितीमुळे घराचे स्वप्न अधुरेच राहते. शासनाने त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मदतीचा हात दिला आहे. जिल्ह्यात १९ हजार ४६२ लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १९ हजार ३२५ लाभार्थ्यांचा घरकुलांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

दि. १ जानेवारी २०२५ पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर केले जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १९ हजार ३२५ लाभार्थ्यांना घरकूल मंजुरी आदेश पत्र प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत आहे. राज्य शासनाने उर्वरित लाभाथ्यर्थ्यांनाही लवकरच हते वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात घरकुलाच्या कोणत्याही लाभार्थ्यांला निधी कमी पडू दिला जाणार नाही. घरकुल योजनेच्या लाभामध्ये ५० हजार रुपयांनी वाढ करुन ती आता २ लाख १० हजार करण्यात आली. भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी मदत करण्यात येत आहे. जमीन खरेदीच्या लाभामध्येही ५० हजार रुपयांची वाढ करून ती १ लाख रुपये करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 26/Mar/2025