रत्नागिरी : शहरातील टिळक आळी, जोशी पाळंद, खालची आळी, वरची आळी, भुवड आळी, परटवणे, फगरवठार गाडीतळ येथील निवृत्त शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी वसंत झगडे यांच्या अध्यक्षतेखाली पतितपावन मंदिरात सभा उत्साहात झाली. याची सुरुवात श्रींच्या प्रतिमेला हार घालून, श्रीफळ वाढवून करण्यात आली.
गुलाबपुष्प देऊन मान्यवर आणि निवृत्त कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले. ज्यांच्या वयाला ७० वर्षे पूर्ण झाली असे विनय लांजेकर, गजानन संसारे, प्रकाश मांजरेकर, विकास मयेकर, श्रीकृष्ण खांडेकर, संपदा सावंत, सुरेखा डाफळे, यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सभासदांनी विभागवार झालेल्या सभेत आपल्या अडचणी मांडल्या. सेवानिवृत्तांच्या समस्या सेवानिवृत्तांसाठी निर्गमित झालेले विविध आदेश, निवृत्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी अध्यक्ष झगडे, विजय भाटकर, राजेंद्र रसाळ यांनी सखोल मार्गदर्शन केले.
गेल्या १० वर्षांत येथे न होऊ शकलेली सभा संयोजक अनंत नैकर आणि विजय भाटकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वी झाल्याचे अध्यक्षांनी सूचित केले. यावेळी वरील परिसरातील सभासद उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 26/Mar/2025














