चिपळूण पालिकेने ‘ती’ जागा बेरोजगार तरुणांना द्यावी : शौकत मुकादम

चिपळूण : येथील पालिकेने बहादूरशेख नाका येथील लघुउद्योगांसाठी आरक्षित असलेली जागा तत्काळ लघुउद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या बेरोजगार तरुणांना द्यावी, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे. त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

बहादूरशेख नाका येथील जागा ही पालिकेने सुशोभित केली. या ठिकाणी पूर्वी झोपडपट्टी होती. तेथील झोपड्या हटवण्यात आल्या. जागेची हद्द ठरवून त्याभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तेथे शौचालय बांधले.

ही जागा वास्तविक लघुउद्योगांसाठी असल्यामुळे त्या जागेचे प्लॉटिंग करून ती लघुउद्योजकांना देणे गरजेचे आहे. तसे आदेश यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत; परंतु या जागेचा वापर आता इतर वेगवेगळ्या कामांसाठी होत आहे. तो तत्काळ बंद करावा, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 26/Mar/2025