रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र न्यायिक प्रशिक्षण संस्था (भाईंदर, ठाणे) यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत ईसीटी ७ चे ई-कोर्ट प्रोग्रामचे एकदिवसीय प्रशिक्षण वकील व लिपिकांना दिले. जिल्हा न्यायालयात हे प्रशिक्षण झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश (क्र. १) अनिलकुमार अंबाळकर यांनी केले. या प्रसंगी रत्नागिरी बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. निनाद शिंदे, सचिव अॅड. रत्नदीप चाचले उपस्थित होते.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अॅड. आयुधा देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात रत्नागिरी बार असोसिएशनचे वकील, लिपिक यांच्यासह ज्येष्ठ वकील पुष्पराज शेट्ये, अॅड. पोतनीस, अॅड. शिवलकर, अॅड. गौरव देसाई आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 26/Mar/2025














