सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील धामापूर रामणवाडी येथील जांगलदेव मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम उत्साहात झाला. नवीन आंगलदेवाच्या मूर्तींचे आगमन व कळसाची मिरवणूक माखजन ते रामणवाडीपर्यंत काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात रंगांची व फुलांची उधळण करण्यात आली. मंदिर शुद्धीकरण वास्तुशांती मूर्तींचा प्राणप्रतिष्ता कळशारोहण सोहळा व उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा व हळदीकुंकू समारंभ झाला.
सायंकाळी मान्यवरांचे सत्कार व महाप्रसाद झाला. रात्री नवज्योत उत्साही मंडळाचे भजन झाले. यानंतर नवसरी देवीच्या पालखी आगमनाचा सोहळा झाला. रात्री साडेदहा वाजता रामणवाडीतील स्थानिक कलाकारांचे बहुरंगी नमन झाले. जांगलदेव मंदिराचा हा बीगोंदाराच कार्यक्रम पाहण्यासाठी परिस्सरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी उत्पपूर्तपणे सहभाग नोंदवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 26/Mar/2025














