देवरूख : शहरातील मातृमंदिर हॉस्पिटल आणि चाळके किडनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख येथे डायलिसिस सेंटरचे उद्घाटन झाले. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि नगर परिषद मुख्याधिकारी चेतन विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होते. आमदार शेखर निकम यांनी यावेळी ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असल्याचे सांगत सामाजिक संस्थांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, अध्यक्षा पल्लवी कोरगावकर, चाळके फाऊंडेशनचे अनिल चाळके, डॉ. गोरे, प्रद्युम्न माने, आणि मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष वैद्यनाथ जागुष्टे यांनीही आपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाला आबा पंदेरे, बंड्या बोरुकर, हनिफ हरचिरकर, बाळु ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, मंगेश बांडागळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 26/Mar/2025














