रत्नागिरी : नाट्य परिषदेतर्फे आज जागतिक रंगभूमी दिन

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीतर्फे गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रतिवर्षीप्रमाणे मारुती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेशपायऱ्यांवर जागतिक रंगभूमी दिन विशेष मुलांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात निवासी आले आहे.

नटराजपूजन आणि विक्षित. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. नाट्य परिषदेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी उत्सवी रंगभूमीवर कार्यरत असलेले बसणी येथील अजित पाटील, स्पर्धात्मक रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रा. सुजन शेंडे यांचा सन्मान होणार आहे.

शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रवेश, रेकॉर्ड डान्स आदी सादरीकरण होणार आहे. इच्छुकांनी आपली नावे अमेय धोपटकर, वामन कदम, सनातन रेडीज यांच्याकडे द्यावीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 27/Mar/2025