मंडणगड : शिक्षिका नीता बोढरे-दारूंटे यांनी पटकावले ३२ पुरस्कार

मंडणगड : अठ्ठावीस विषयांवरील शैक्षणिक व्हिडिओ सादर करणाऱ्या मंडणगड तालुक्यातील तत्कालीन शिक्षिका नीता बोढरे-दारूंटे यांनी देदीप्यमान यश संपादित केले. ३२ पारितोषिकांवर आपली मोहर उमटवताना एकूण १ लाख ८७ हजार ५०० रुपयांची राज्यात सर्वाधिक बक्षीस रक्कम मिळवणाऱ्या शिक्षिका ठरल्या आहेत. त्यांना २५ मार्चला रत्नागिरीत गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला रत्नागिरी डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर, माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक सागर पाटील, ज्येष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, अधिव्याख्याता राजेंद्र लट्टे व अधिकारी, शिक्षक उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत २०२३ वर्षात म्हाप्रळ शाळा नं. १ मध्ये त्यांनी ही किमया साध्य केली.

शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा व शाळेत गुणवंत विद्यार्थी घडावेत, या अनुषंगाने सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. पहिली ते दुसरीमध्ये भाषा, गणित, इंग्रजी, तिसरी ते पाचवी भाषा, इंग्रजी, परिसर अभ्यास सहावी ते आठवी भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे नववी ते दहावी भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे यामध्ये तिसरी ते पाचवी परिसर अभ्यास हा विषय वगळता तालुकास्तरावर उर्वरित पंधरा विषयात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेत सात प्रथम क्रमांक, तीन द्वितीय क्रमांक व सहा विषयात तृतीय क्रमांक मिळवले आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या व्हिडिओ संख्येनुसार त्या राज्यात तिसऱ्या व सर्वाधिक बक्षीस रक्कम मिळवणाऱ्या राज्यातील प्रथम क्रमांकाच्या स्मर्थक शिक्षिका ठरल्या आहेत.

जिल्हा बदलीने त्यांची पुणे येथे बदली झाली असून ३० सप्टेंबर २०२४ ला त्यांना म्हाप्रळ शाळेत निरोप देण्यात आला. निकाल जाहीर झाल्याने एका डोळ्यांत आनंदाश्रू तर एका डोळ्यांत बदलीने शाळा सोडून जातानाचे दुःखाश्रू होते.

बक्षीस मिळाल्यानंतर विविध स्पर्धा राबवल्या, खूप आनंद तर झाला. मुलांसाठी अजून अजून महाराष्ट्र नवीन शासनाने शैक्षणिक साहित्य निर्माण होईल. शिक्षकांमधील सर्जनशीलता वाढेल. अशा प्रकारचे पुरस्कार तंत्रस्नेही शिक्षकांना प्रोत्साहित करतील. हा पुरस्कार माझ्यासाठी माझ्यावरील विश्वास दृढ करण्यासाठी आणि हा पुरस्कार मला विद्यार्थ्यांना अजून नवीन उपक्रम राबविण्यासाठी व कृतियुक्त अध्यापन करण्यासाठी प्रेरणा देईल. नीता बोढरे, शिक्षिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 27/Mar/2025