रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करून, सतर्क राहावे आणि दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
विधानसभा निवडणूक २०२४ ची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जस्मिन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, एसएसटी पथक मोठे बनवा, भारत निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असणार आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावे. संशयास्पद व्यवहार आणि वाहतुकीवरही पथकाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदान होईल याची आतापासूनच काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, गोवा बनावटीच्या महा वाहतूक प्रकरणातील यापूर्वीची माहिती पोलिस विभागाला द्यावी, जेणेकरुन त्याच्या मुळाशी जाता येईल. आरोपींची सविस्तर माहिती काढता येईल. पोलिस, महसूल, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर असे सर्वसमावेशक पथक तपासणी नाक्यावर तैनात करू.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 07/Oct/2024
