राजापूर : पाचलमध्ये जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धेचे आयोजन

पाचल : पाचल पंचक्रोशी धनगर समाजाच्या वतीने धनगरी पारंपरिक दसरा सोहळ्यानिमित्त १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये घेण्यात येणार असून, याची जय्यत तयारी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोख रुपये ९९९९ व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये ५५५५ व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रोख रुपये ३३३३ व आकर्षक चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाचल पंचक्रोशी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 07/Oct/2024