गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर बनवलेला काँक्रीटचा रस्ता निकृष्ट

रामपूर : चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर रामपूरपर्यंत मनीषा कन्स्ट्रक्शनने बनवलेला रस्ता एका वर्षात अत्यंत निकृष्ट झाला आहे. मार्गताम्हाणे बाजारपेठेत रस्ता झालाच नाही. रामपूर तळे ते एसटी स्टँड रस्ता नाही. पद्मावती बोर्ड समोर, पुलापासून पुढे, सुतारवाडी मार्गताम्हाणे, विजयश्री हॉस्पिटल घोणसरे, चिवेली फाटा, घोणसरे कुंभारवाडी येथील रस्ता, गायकर स्टॉप, मारुती मंदिर रामपूर, गुढे, रामपूर हॉस्पिटल, मिलिंद हायस्कूल समोर रस्त्यावरील सिमेंट उडून गेले.

सर्वत्र खडी दिसत असून रस्ता खडबडीत झाला आहे. अनेक ठिकाणी प्रचंड भेगा व खड्डे पडले आहेत. रामपूर गुढेफाटा जवळ चैतन्य प्रसाद हॉटेल पासून प्राध्यापक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण जे.सी.पी. ने काढले. रस्ता सुरुवातीचा १५ ते २० मीटर केला नाही. रस्ता अत्यंत निकृष्ट झाला आहे. याची दखल संबंधित विभागाने घ्यावी व ठेकेदाराकडून रस्त्याची डागडुजी करून घ्यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 28/Mar/2025